Rare Bandishes of Pts. Bhatkhande, Paluskar and Deodhar

Concert Review
Concert Review

When: Sat May 1, 2010 6pm to 8pm

Where: Rangasvar Auditorium, Yashwantrao Chavan Center, Nariman Point, Mumbai

महाराष्ट्राच्या सुवर्ण जयंती निमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित केल्या जाणार्‍या सांस्कृतिक महोत्सवात महाराष्ट्राने कला क्षेत्रात गेल्या ५० वर्षात जोपासलेल्या व येथील कलाकारांनी आपल्या प्रतिभेने समृद्ध केलेल्या प्रयोगशरण कला-परंपरांचा आपण आस्वाद घेणार आहोत.

या महोत्सवाच्या पहिल्या सत्रामध्ये पं. विष्णू नारायण भातखंडे व पं. विष्णू दिगंबर पलुस्कर व या दोहोंचे अनुगामी असणारे पं. बाळकृष्ण रघुनाथ देवधर यांच्या सांगीतिक योगदानाचा परामर्श घेण्यात येणार आहे.

ही तिन्हीही मराठी माणसे आपल्या समग्र देशात व जगाच्या पाठीवर जिथे जिथे म्हणून उत्तर भारतीय अभिजात संगीताचा प्रचार झाला आहे त्याला कारणीभूत ठरली आहेत व म्हणूनच केवळ महाराष्ट्रास नव्हे, तर जागतिक पातळीवर ललामभूत ठरली आहेत. मुसलमानी व इंग्रजी राजवटीत स्वतःचे स्वत्व जवळपास गमावून बसलेल्या या संगीतविद्येला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून त्यातील कलाविचाराची जोपासना करण्यासाठी लागणारे भगीरथ प्रयत्न भातखंडे, पलुस्कर व देवधरच करू जाणोत. या सर्वांनी संग्रहित केलेल्या परिचित आणि अपरिचित अशा आकर्षक बंदिशी पं सत्यशील देशपांडे आपल्या छोटेखानी मार्मिक भाष्यासह सादर करणार आहेत – संगीताचे प्रचारक म्हणून सर्वमान्य व वन्दनीय ठरलेल्या या विभूतिंचा कलाविचार किती प्रगल्भ होता हे सिद्ध करण्या साठी .

संगतकार:
संवादिनी: श्री अरविन्द थत्ते
तबला: श्री मिलिंद पोटे

स्थळ: रंगस्वर सभागार, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई
दिनांक: १ मे, सायंकाळी ६ वाजता